यशवंत क्रांती" च्या माध्यमातून मेंढपाळांना ओळखपत्र संजय वाघमोडे

👤 आष्टा प्रतिनिधी | 📅 27 June 2026 | 👁 202 Views
यशवंत क्रांती" च्या माध्यमातून मेंढपाळांना ओळखपत्र    संजय वाघमोडे
आष्टा : भटकंती करणाऱ्या मेंढपाळ यांच्याकडे मेंढपाळ असलेला कोणताही पुरावा नसलेने त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण ओळखून यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मेंढपाळांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले या सर्व मेंढपाळांना लवकरच शासनाची ओळखपत्र मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी आष्टा येथे मेंढपाळ मेळाव्यात बोलताना सांगितले. मेंढपाळ ओळखपत्र वाटप कार्यक्रम आष्टा येथील बिरोबा मंदिर येथे संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे बोलत होते. कार्यक्रमास सुभाष वग्रे शाहुवाडी तालुकाध्यक्ष, राजाराम हजारे शेंडूर शाखाध्यक्ष, भीमराव गावडे शाखाध्यक्ष आष्टा, बिरू अनुसे शाखाध्यक्ष वाठार , संदिप गावडे, तानाजी टकले, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की. राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधासाधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याच्या पाण्याच्या शोधात रानवाटेने, जंगलातून त्याच्या कुटुंबासमवेत स्थलांतर करीत असतात व त्यांच्या मुळस्थानी पाऊस होऊन मेंढ्यांना चारा उपलब्ध झाल्यास साधारणपणे जुन ते जुलै महिन्यामध्ये मेंढपाळ त्यांच्या मुळ ठिकाणी परत येतात. तर काही मेंढपाळ जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाच्या प्रदेशात स्थलांतर करत असताना. मेंढी पालन हा व्यवसाय अवर्षण प्रवण भागामध्ये प्रामुख्याने केला जात असल्यामुळे काही भागात पाऊस फार अत्यल्प होत असतो अशावेळी पावसाळी हंगामामध्ये सुद्धा चारा उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कित्येक मेंढपाळांची भटकंती ही वर्षभर सुरूच असते. भटकंती काळात मेंढपाळांच्या मुक्कामाचे ठिकाण लोकवस्तीपासून लांब रानामध्ये कुठेतरी असते, म्हणजेच त्यांचा संपर्क पशुवैद्यकीय दवाखान्याशी सहसा येत नाही तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या यंत्रणेला सुद्धा भटकंती काळामध्ये मेंढपाळापर्यन्त पोहचण्याकरिता अडचणी येत असतात. त्यामुळे मेंढपाळांच्या मेंढ्यांमध्ये आजार उद्भवल्यास त्यांच्या पर्यन्त पशुवैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध होत नाही व यामुळे मेंढयामध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होऊन मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होते.

भटकंतीच्या काळात मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधाकरिता फार हालपेष्टा सोसाव्या लागतात. भटकंती काळात खरीप हंगामामधील शेतकऱ्यांच्या शेती मधील पीक काढल्यानंतर जे पिकांचेअवशेष शिल्लक राहतात त्यामध्ये चराई करून मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांचे पोट भरतात.

अशा परिस्थितीमध्ये मेंढपाळांकडे ते स्वतः मेंढपाळ असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यामध्ये गैरसमज निर्माण होतो व त्यामुळे मेंढपाळ आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊन स्थानिक गावकऱ्यामार्फत 'भटकंती करीत असलेल्या मेंढपाळांना मारहाण होत असल्याच्या घटना वारंवार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बरेच ठिकाणी भटकंती करीत असताना मेंढपाळ असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसल्याने त्यांना चोर समजून मारहाण करण्यात येते. यामध्ये मेंढपाळांकडे मेंढपाळ असल्याची ओळख नसल्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणे मार्फत सुद्धा मेंढपाळांना सुरक्षा देण्याकरिता टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. यासोबतच मेंढपाळांकडे ते स्वतः मेंढपाळ असून मेंढ्यांच्या चाऱ्याकरिता भटकंती करीत असल्याचा कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे त्यांना भटकंतीमार्गावरील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुवैद्यकीय सुविधा, वन विभागामार्फत जंगली प्राण्यापासून संरक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सुविधा तसेच पोलीस यंत्रणेमार्फत संरक्षण इत्यादी सुविधा मिळवतांना मेंढपाळांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता मेंढपाळांना ते स्वत भटकंती करणारे मेंढपाळ असल्याचा पुरावा म्हणून त्यांना ओळख-प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
राज्यातील मेंढपाळांना ओळखपत्र देण्याबाबत यशवंत क्रांती संघटनेचे माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जे मेंढपाळ यशवंत क्रांती शी जोडले गेले आहेत त्यांना यशवंत क्रांती च्या वतीने ओळख पत्र देण्यात येत आहेत..
कार्यक्रमास सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ बहुसंख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |