ईश्वरपुरात सोन्याची चैन व दुचाकी चोरीचा गुन्हा उघड

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 26 June 2026 | 👁 249 Views
ईश्वरपुरात सोन्याची चैन व दुचाकी चोरीचा गुन्हा उघड
ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आझाद चौकातील बाबा ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या 18 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 24/06/2026 रोजी दुपारी 3.30 वा. हणमंतनगर विटा येथील अरुण सर्जेराव साळुंखे वय-43 हे बाबा ज्वेलर्स दुकानात गेले होते. त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसासाठी सोन्याची चैन गिफ्ट देण्यासाठी ते दुकानात चैनची किंमत व वजनाची चौकशी करत होते. याचवेळी दुकानातील दाखविण्यासाठी काढलेल्या चैनमधील दोन चैनी चोरट्याने पळवून नेल्या. त्याला अटक करून
1. 2,40,000 रु. किमतीच्या दोन सोन्याच्या चैनी - वजन 14.33 ग्रॅम
2. 1,00,000 रु. किमतीची एक मोटरसायकल
3. बनावट नंबर प्लेट असं एकूण 3,40000 किंमतीचा किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला
आरोपी विनायक प्रकाश पाटील, वय 18 वर्षे, रा. दत्तवाडा दत्तप्रसाद केशव फॅक्टरी पोहोरेम पोस्ट सेनुलम, जि. नॉर्थ गोवा, राज्य गोवा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदिप पाटील व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली. आरोपीला दि. 24/06/2026 रोजी रात्री 11.40 वा. अटक करण्यात आली. गुन्हा रजि. नं. 244/2026 भा.न्या.संहिता कलम-305(अ), 3(4) अन्वये दाखल.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |