सोलापूर शहरात १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू

👤 अतुल फसाले | 📅 23 June 2026 | 👁 201 Views
सोलापूर शहरात १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू


सोलापूर, दि. २२ – सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. २४ जून २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजता लागू होणार असून तो दि. ८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, चाकू, लाठ्या, स्फोटके, क्षेपणास्त्रे, उपरोधिक पदार्थ तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक गाणी, संगीत वाजवणे, अश्लील चित्रे किंवा चिन्हे प्रदर्शित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून जप्त केलेली शस्त्रे व वस्तू राज्य सरकारकडे जमा करण्यात येतील.तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींच्या संमेलनास, मिरवणुकीस, लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड व फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, कायदेशीर सभा, शैक्षणिक उपक्रम, कारखाने, दुकाने, चित्रपटगृहे, नाटकगृहे, सरकारी कार्ये व परवानगी दिलेल्या संमेलनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |