य. मो.कृष्णा कारखान्याची सत्ता अबाधित राहणार कि पालटणार?

👤 राहुल टिबे सांगली | 📅 22 June 2026 | 👁 188 Views
य. मो.कृष्णा कारखान्याची सत्ता अबाधित राहणार कि पालटणार?
य. मो.कृष्णा कारखान्याची सत्ता अबाधित राहणार कि पालटणार?
गेलं काही दिवसांपासून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि विरोधी कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल यांनी एकमेकांविरोधात कंबर कसली होती. दोन्हीकडून जोरदार प्रचार यंत्रणा,सभा आणि वैयक्तिक भेटीगाठींवर जोर दिला गेला. यामध्ये सहकार पॅनल कडून कारखाना आधुनिकीकरण त्याचबरोबर घरपोच साखर आणि नवीन इरिगेशन सिस्टीम ऊसाला उच्चं की दर अशी आश्वासने दिली गेली आहेत तर संस्थापक पॅनल कडूनही 120 किलो साखर घरपोच, पूर्वीची पाणीपट्टी 17500 वरून 7500 एकरी, करणार आणि बैठी पाणीपट्टी रद्द करणार, एफ आर पी पेक्षा जास्त दर देणार, नवीन युपी बिहारी कामगार काढून टाकणार आणि स्थानिकांना प्राधान्य देणार असे आश्वासन देण्यात आले आहे.
एकूणच दोन्हीकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात आली आहे. एकूण 21 जागांसाठी असणाऱ्या मतदानासाठी सर्वांनी बाजी लावली आहे अशातच कप बशी सोडा आणि नारळ हातात घ्या असा निरोप आल्याच्या चर्चा ऐकायला येत होत्या त्यामुळेच आता कृष्णा कारखान्याची सत्ता पालटणार कि अबाधित राहणार अशा चर्चांना उधाण आले आहे. एकूणच उद्याच्या निकालानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल तोपर्यंत वेट अँड वॉच कराव लागणार आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |