जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 24 Views
जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे निर्देश

जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

'जलसिंधू ' निवासी संकुल प्रकल्प शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनमान उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. या वसाहतीचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी सदर निवासी संकुलामध्ये असणाऱ्या सोयी सुविधेविषयी माहिती दिली. ते म्हणाले या प्रकल्पाचे काम दिड वर्षात पूर्ण करून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |