पालकमंत्री नितेश राणे यांच्या मंगळवार २३ जून रोजी वाढदिवसानिमित्त हळवल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असून, त्याचबरोबर खाऊचेही वाटप केले जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका निमंत्रित सदस्य शशिकांत राणे यांनी सांगितले.