कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी २२ जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 106 Views
कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी २२ जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन
रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान
समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्मृतिदिन कार्यक्रम कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.०० वाजता कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
"त्यांचे व्यर्थ न हो बलिदान" या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या कार्याचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा जागर करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासह शेतकरी सन्मानाचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार विनायक राऊत,ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, मुंबई माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, बाळा भिसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर आदि उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनतर्फे सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |