कणकवली नगरपंचायतमार्फत "एकल महिला दिवस" होणार साजरा...

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 152 Views
कणकवली नगरपंचायतमार्फत "एकल महिला दिवस" होणार साजरा...
महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे “एकल महिला धोरण” तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने दि. २३ जून रोजी साजरा होणारा “आंतराष्ट्रीय विधवा दिन” हा “एकल महिला दिवस” म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाणे कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना– शहरी (DJAY-S), महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वा. नगरवाचनालय हॉल कणकवली येथे “आंतराष्ट्रीय विधवा दिन “ ( International widow Day) हा “एकल महिला दिवस “ म्हणून साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये कणकवली शहरातील सर्व एकल महिलांच्या समस्या, अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पेन्शन योजना एकल महिलांना रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शहरातील जास्ती जास्त एकल महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व मार्गदर्शनचा लाभ घ्यावा. असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील व नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर यांनी केल आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |