गुंजाळवाडी, ता.संगमनेर प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता आमदार अमोल खताळ

👤 संकेत तुकाराम सानप | 📅 15 June 2026 | 👁 270 Views
गुंजाळवाडी, ता.संगमनेर प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता आमदार अमोल खताळ
गुंजाळवाडी, ता.संगमनेर प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता
गुंजाळवाडी येथे महायोगी प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनाला तथा सांगता सोहळ्याला सपत्नीक उपस्थित राहून स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य 'काल्याचे किर्तन' श्रवण करण्याचा आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेण्याचा अत्यंत सुखावह अनुभव मिळाला.

यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना, जनतेची सेवा करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते, ती ऊर्जा मला अशा पवित्र आणि धार्मिक कार्यक्रमांमधून मिळते. गेल्या ६ महिन्यांपासून अतिशय उत्तम पद्धतीने या भव्य सप्ताह सोहळ्याचे नियोजन करणाऱ्या आयोजन समितीचे आणि त्यांना अहोरात्र सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा सोहळा इतका अभूतपूर्व ठरला. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी या सोहळ्याला दररोज हजेरी लावून रामायणाचार्य ढोक महाराजांच्या रामायण कथेचा लाभ घेतला.

या सांगता सोहळ्यामधून आदरणीय ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या सूचनेचा मान राखून, आगामी वर्षापासून संगमनेरमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या नावाने भव्य सप्ताह सोहळा आयोजित केला जाईल, असा शब्द मी या प्रसंगी दिला. शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच आपले ध्येय असेल.आमदार अमोल खताळ
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू | गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी |