ईश्वरपूर मध्ये अहिल्यादेवी जयंती निमित्त अभूतपूर्व मिरवणूक

👤 राहुल टिबे सांगली | 📅 13 June 2026 | 👁 652 Views
ईश्वरपूर मध्ये अहिल्यादेवी जयंती निमित्त अभूतपूर्व मिरवणूक
शनिवार दिनांक 13/06/26 रोजी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने श्री चिमणभाऊ डांगे आणि विश्वनाथ डांगे यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व भव्य दिव्य अशी मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणूक मध्ये हत्ती, उंट,घोडे तसेच अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर आधारित विविध जिवंत देखावे तसेच धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य होते यामध्ये लहान मुलींनी केलेले गजनृत्य हे प्रमुख आकर्षण ठरले. यामध्ये शेकडो ढोल वादकांनी एकच सुरात ढोल वाजवून संपूर्ण शहर दनानून सोडले. त्याचबरोबर धनगर समाजाचे आराध्य दैवत असणारे श्री बिरुदेव आणि मायाक्का देवी देवस्थाना विविध ठिकाणचे 21 संत महंत उपस्थित होते. त्यांनी सर्व जनसमुदायाला आशीर्वाद दिले.
या मिरवणुकीसाठी धनगर समाजाचे खासदार श्री राम वडकुते साहेब, जतचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर, शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महायुतीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर धनगर समाज बांधव आपल्या सहकुटुंब, सह परिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |