रस्तावरील खड्डयाचा प्रश्न ऐरणीवर, सांगुळवाडीत रिक्षा पलटी होऊन अपघात, ग्रामस्थानी रोखला मार्ग

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 119 Views
रस्तावरील खड्डयाचा प्रश्न ऐरणीवर, सांगुळवाडीत रिक्षा पलटी होऊन अपघात, ग्रामस्थानी रोखला मार्ग
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे शुक्रवारी दुपारी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला यात तिन प्रवाशी जखमी झाले असून यानंतर ग्रामस्तानी रस्तारोको केल्याने नावळे, अरुळे सडूरे रस्त्यावरील वाहतूक तासभर पुर्ण पणे बंद होती सभापती सिद्धेश रावराणे आणि नागराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी सोमवार पर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित कारण्यात आले.

अपघातानंतर शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी रावराणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन तासभर वैभववाडी नावळे - सडुरे रस्ता वाहतूकी साठी बंद केला त्यामुळे सुमारे तासभर हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला होता अपघातची माहिती मिळताच सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, पं.स.सदस्य देवानंद पालांडे घटनास्थळी दाखल झाले यावेळी ग्रामस्तानी नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत आतापर्यंत चार अपघात झाले आहेत मात्र प्रशासनाला जाग येत नाही असे खडे बोल सुनावले या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी निवेदन देऊनही नगर पंचायत प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले अखेर सभापती व नगराध्यक्ष यांनी सोमवारपर्यंत मार्ग सुस्थितीत केला जाईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केलं स्थगित केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |