आचिर्णे धनगरवाडा वासियांसाठी मा.आमदार तथा पालकमंत्री नितेशजी राणे ,जिल्हा बँक संचालक मा.श्री .दिलीपजी रावराणे व वैभववाडी पंचायत समिती सभापती मा.श्री.सिद्धेशजी (बंटी) रावराणे ठरले खरे हीरो

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 429 Views
आचिर्णे धनगरवाडा वासियांसाठी  मा.आमदार तथा पालकमंत्री नितेशजी राणे ,जिल्हा बँक संचालक मा.श्री .दिलीपजी रावराणे व वैभववाडी पंचायत समिती सभापती मा.श्री.सिद्धेशजी (बंटी) रावराणे ठरले खरे हीरो
गेले काही दिवस आचिर्णे धनगरवाडी येथील नळयोजनेच्या विहीरीतील मोटर बंद होती . म्हणून आचिर्णे धनगरवाडी मधील सर्व मंडळींनी एकत्र येऊन चर्चा करून मा . श्री दिलीप रावराणे व सभापती सिद्धेश( बंटी ) रावराणे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मोटर संदर्भात विषय मांडला . त्यावेळी मोटर संदर्भात जिकाही जबाबदारी असेल ती मा . श्री दिलीपजी रावराणे व सभापती सिद्धेश रावराणे यांनी घेतली व मा . आमदार तथा पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी चर्चा करून मोटर व नविन पाईप देण्याचे आश्वासन दिले . व लगेच तात्काळ निधितून नविन मोटर व नवीन पाईप आचिर्णे धनगरवाडा वासियांना देण्यात आली . तसेच आज दिनांक ११/६/२०२६ रोजी सर्व आचिर्णे धनगरवाडीतील ग्रामस्थ व प्रशासक सरपंच मा . वासुदेव रावराणे यांच्या सहकार्याने विहीरीत सोडण्यात आली आणी फुटलेले पाईप पण जोडण्यात आले . व पाणीपुरवठा ताबडतोब चालू करण्यात आला .
त्या बद्दल आचिर्णे धनगरवाडा वासियांनी मा आमदार तथा पालकमंत्री नितेशजी राणे, मा . श्री दिलीपजी रावराणे, सभापती मा . श्री सिद्धेशजी रावराणे तसेच मा . श्री . वासुदेव रावराणे यांचे आभार मानले .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |