मिठमुंबरीत मनरेगा अंतर्गत बांधलेल्या गोठ्याचा वापर इतरत्र कामासाठी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 242 Views
मिठमुंबरीत मनरेगा अंतर्गत बांधलेल्या गोठ्याचा वापर इतरत्र कामासाठी
मिठमुंबरी सरपंच यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मीठमुंबरी येथील विजय शांताराम तोडणकर यांना सन २०२२-२३ मध्ये गोठा बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. सदर गोठा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये गुरे ठेवणे बंधनकारक असल्याचा ठराव मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित लाभार्थ्याने १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लेखी हमीपत्रही दिले होते, असे ग्रामपंचायतीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मात्र गोठा बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप गोठ्यात गुरे ठेवण्यात आलेली नसून सध्या त्या ठिकाणी आंबा काढणीसाठी आलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा साठा ठेवण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत संबंधित लाभार्थ्याने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत मीठमुंबरी ग्रामपंचायत सरपंच यांनी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग |