भिरवंडे वनपरिमंडळात पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम; वृक्षारोपणाने दिला संवर्धनाचा संदेश

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 114 Views
भिरवंडे वनपरिमंडळात पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम; वृक्षारोपणाने दिला संवर्धनाचा संदेश
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनक्षेत्र कणकवली अंतर्गत वनपरिमंडळ भिरवंडे येथील नियतक्षेत्र कुंभवडेमधील श्री महालिंगेश्वर देवालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसराची साफसफाई करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे जैवविविधता संवर्धन व संगोपन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास कुंभवडे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वनपाल भिरवंडे श्रीम. कुसुम कांबळे,वनपाल दिगवळे सदाशिव वागरे ,वनरक्षक भिरवंडे सिद्धार्थ शिंदे ,वनरक्षक कुंभवडे श्री. प्रभू काळे, तसेच वनक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यावरण संरक्षण व जनजागृतीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |