जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली गावात वृक्षारोपण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 118 Views
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली गावात वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली गावात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच सचिन पारधीये यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी कृषी अधिकारी श्रीमती प्रभु, कृषी सहाय्यक साधना जाधव, कळसुलीच्या पोलिस पाटील सारिका कदम यांच्यासह अन्विता कदम, आराध्या घाडीगावकर, मोहिनी घाडीगावकर, नीता गुरव, सुकन्या कदम, प्रज्ञा कदम, कविता कदम, भाग्यश्री राणे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थितांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |