विद्यार्थिनीने दिली प्रशालेला ग्रेट भेट

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 130 Views
विद्यार्थिनीने दिली प्रशालेला ग्रेट भेट
सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम उपक्रम
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथील माजी विद्यार्थिनी कुमारी वल्लरी निलेश राणे हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय प्रशालेतील शिक्षक व शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला देत तिने प्रशालेला एक सिलिंग फॅन भेट स्वरूपात प्रदान केला असून तो फॅन तिने ज्या वर्षी सातवी या वर्गात प्रवेश घेतला त्याच वर्गात लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कुमारी वल्लरी हिने शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेल्या संस्काराची जपणूक करून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखावी असा आदर्श तिच्या कृतीतून निर्माण झाला आहे.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा.श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा.श्री.बयाजी बुराण तसेच शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री.आर.एस.सावंत व सदस्य सन्मा. श्री. संतोष सावंत उपस्थित होते. त्यांनी वल्लरीला तिच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि तिच्या या योगदानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे देखील सांगितले आहे. तिचा आदर्श सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यावा असा आशावाद व्यक्त केला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग |