कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 99 Views
कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.पर्यावरण रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवणे हे मानवाच्या हातात आहे.त्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा आणि त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतूने कनेडी प्रशालेत दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो.
यावेळी शालेय समितीचे चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत, सदस्य सन्मा.श्री.संतोष सावंत यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री.बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |