शिडवणे नं. १ शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न!

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 152 Views
शिडवणे नं. १ शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न!
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
​सकाळी ठीक पावणेदहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा परिसरात एकूण ५ विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, रतांबा (कोकम), वड, पिंपळ आणि जांभूळ या पर्यावरणपूरक व बहुगुणी वृक्षांचा समावेश आहे.
​या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य योगेश सुतार व तारीफ शेख, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षक सुरेंद्र यादव उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर, ग्रामस्थ सत्यवान गुंडये व अनिल गुंडये यांनीही उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला. शाळेचे विद्यार्थी मंथन भोवड आणि कार्तिक सुतार या विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |