वैभववाडीत मान्सूनचे दमदार आगमन...

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 167 Views
वैभववाडीत मान्सूनचे दमदार आगमन...
तालुक्यात रविवारी दुपारी मान्सूनचे दमदार आगमन झाले. तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. काल देखील तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी जवळपास तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे उकडाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील भुईबावाडा व सर्व घाट परिसरात जोरदार पाऊस झाला.
पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल माती आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे घाट मार्गातून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या अंदाजे 9 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यावरील पाणी टंचाईचे संकट टळले होते. मात्र यावर्षी मे महिन्यात संपूर्ण सहा जून उजाडला तरी ही पावसाचे आगमन झाले नाही. शेतकरी शेताची जय्यत करून हा आकाकडे नजरा लावून बसले होते.

अखेर रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह काही भागात पावसाचा जोरदार वर्षाव झाला. तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना अधिक गती मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम शेतीची मरू केली आहे. पुढील चार दिवस पाऊस असाच झाल्यास शेतकरी भात पेरणीस पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सु करणार हे निश्चित आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |