ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 142 Views
ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी ऑनलाईन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस दलाच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कामकाजाचा मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. ऑनलाइन गेमिंग, मटका, जुगार तसेच इतर अवैध सायबर स्वरूपाच्या कृत्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा साक्षरतेच्या दृष्टीने राज्यातील अग्रगण्य जिल्ह्यांपैकी एक असून नागरिकांमध्ये सायबर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणे, युवकांना ऑनलाइन फसवणूक आणि अवैध ऑनलाइन व्यवहारांपासून दूर ठेवणे तसेच सायबर गुन्ह्यांविरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, विविध पोर्टल्स आणि अत्याधुनिक डिजिटल टूल्सचा प्रभावी वापर करून अधिकाधिक गुन्ह्यांची उकल करण्यावर भर देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच ऑनलाइन पद्धतीने जुगार, मटका आणि अन्य अवैध व्यवहार करणाऱ्या व्यक्ती व नेटवर्कचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
पालकमंत्री श्री. राणे यांनी जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचे संदेश पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावरील गैरप्रकारांबाबत सतर्क करण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नियमित आढावा बैठका आयोजित करून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करावा, विविध विभागांमध्ये समन्वय वाढवावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक परिणामकारकपणे राबवाव्यात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |