असलदे येथील स्वराज पाटील यांची कराटे चॅम्पियनशिप दमदार कामगिरी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 99 Views
असलदे येथील स्वराज पाटील यांची कराटे चॅम्पियनशिप  दमदार कामगिरी
नेपाळ काठमांडू येथे झाली आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्वराज पाटील याने पटकावले सुवर्णपदक
कणकवली तालुक्यातील असलदे गावचा युवा खेळाडू स्वराज संतोष पाटील याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित ७५ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत स्वराज संतोष पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या गुणवत्तेची छाप पाडल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही स्पर्धा दि. ३ जून ते ४ जून २०२६ दरम्यान पार पडली. स्पर्धेत ५० किलो वजन गटात सहभागी होत स्वराजने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या या यशामागे पालकांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक सेन्सेई सोनू नाईक (गुरुजी) यांचे मोलाचे योगदान आहे. स्वराज यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आला आहे. त्याने कर्नाटक २०२५ येथे कांस्यपदक तसेच कोल्हापूर २०२५ येथील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकून त्याने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

स्वराजच्या या उल्लेखनीय यशामुळे असलदे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे इतर युवक-युवतींनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |