मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव

👤 संतोष एडके तासगाव | 📅 11 June 2026 | 👁 291 Views
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव
मणेराजुरी (ता. तासगाव):
येथील चिमणखोरा पाझर तलावात बुडणाऱ्या आपल्या ७ वर्षांच्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात मंजू संतोष जाधव (वय ७) आणि तिची आई सत्यवाला संतोष जाधव (वय २८) या माय-लेकींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे मणेराजुरी आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
​खेळताना पाय घसरून चिमुरडी पडली पाण्यात
​मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास सत्यवाला जाधव या आपल्या दोन मुलींसह मणेराजुरी-वज्रचौंडे मार्गावरील भोसलेनगर जवळील 'चिमणखोरा पाझर तलावावर' कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सत्यवाला या मोठ्या मुलीसोबत कपडे धुण्यात व्यस्त असताना, लहान मुलगी मंजू तलावाच्या काठावर खेळत होती. खेळत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती तलावाच्या खोल पाण्यात पडली.
​लेकीला वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी
​मंजू पाण्यात बुडत असल्याचे पाहताच, आई सत्यवाला यांनी कोणताही विचार न करता तिला वाचवण्यासाठी थेट तलावात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तलावाची खोली जास्त असल्याने त्या दोन्ही माय-लेकी पाण्यात बुडू लागल्या.
​मोठ्या मुलीने दिली माहिती; गावकऱ्यांची धाव
​हा प्रकार पाहून सोबत असलेल्या मोठ्या मुलीने तात्काळ घरी जाऊन आजी-आजोबा आणि गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून माय-लेकींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
​घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |