राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत

👤 अतुल फसाले | 📅 10 June 2026 | 👁 126 Views
राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत
संबंधित लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयाकडे दोन दिवसांच्या आत जमा कराव्यात, • आधार कार्ड, • पॅन कार्ड, • बँक पासबुक, • पी.पी.ओ. आदेश असल्यास त्याची प्रत
सोलापूर दि. 9 - मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.-४४/स्वासैक-१, दिनांक २६ में २०२६ अन्वये राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन योजना डीबीटी (DBT) पोर्टलवर समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास सन्मान निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या वारसपत्नी यांची अद्ययावत माहिती शासनास सादर करावयाची आहे.

तरी संबंधित लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयाकडे दोन दिवसांच्या आत जमा कराव्यात,
• आधार कार्ड,
• पॅन कार्ड,
• बँक पासबुक,
• पी.पी.ओ. आदेश असल्यास त्याची प्रत.

सदर माहिती तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे संकलित करण्यात येत आहे. ज्या स्वातंत्रसैनिक पेन्शनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसहची माहिती अद्याप दिली नाही, त्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा तलाठी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करता येणार नाही व निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (स्वातंत्र्य सैनिक शाखा) दूरध्वनी क्र. ०२१७-२७३१०२० येथे संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |