शिवसेनेने निवडणूक रणशिंग फुंकला निवडणूक तयारीला वेग; मालपाणी लॉन्स येथे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई | 📅 08 June 2026 | 👁 62 Views
शिवसेनेने निवडणूक रणशिंग फुंकला निवडणूक तयारीला वेग; मालपाणी लॉन्स येथे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवसेना संगमनेर व अकोले विधानसभा यांच्या वतीने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे BLA प्रशिक्षण आणि SIR माहिती शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराला पदाधिकारी, बूथ लेव्हल एजंट (BLA), शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात निवडणूक आयोगाचे माजी उपायुक्त मा. अविनाश सणस साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR), मतदान केंद्रनिहाय नियोजन, मतदार नोंदणीतील आवश्यक बाबी तसेच BLA यांच्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेत बूथस्तरावरील कामाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दक्षतेने व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये मतदारसंघातील प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, संघटनात्मक बळकटीकरण, निवडणूकपूर्व तयारी आणि कार्यकर्त्यांचे प्रभावी नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. उपस्थितांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
शिवसेना संगमनेर व अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, BLA-1, सर्व BLA आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. आगामी निवडणुकांमध्ये संघटना अधिक सक्षम, सजग आणि विजयासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आयोजकांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |