एकजुटीतूनच समाजाची प्रगती; तासगाव तालुका कुंभार समाज मेळाव्यात गुणवंतांचा गौरव!

👤 संतोष एडके तासगाव | 📅 07 June 2026 | 👁 495 Views
एकजुटीतूनच समाजाची प्रगती; तासगाव तालुका कुंभार समाज मेळाव्यात गुणवंतांचा गौरव!
"जोपर्यंत समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत समाजाची सर्वांगीण उन्नती शक्य नाही. आजच्या तीव्र स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे," असे प्रतिपादन सांगली जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले.
तासगाव तालुका कुंभार समाज संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त युवक-युवती आणि त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सातारा येथील कार्यकारी अभियंता संतोष कुंभार, स्वीकृत नगरसेवक तुकाराम कुंभार, 'साप्ताहिक कुंभशिल्प'चे संपादक नितीन कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला सौ. सोनाली किरण कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मार्गदर्शन करताना कार्यकारी अभियंता संतोष कुंभार म्हणाले की, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, अशा सत्कारातून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तर तुकाराम कुंभार यांनी गुणवंतांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी कुंभार समाजाचे नेते सोमनाथकुंभार यांनीही चांगला समाज घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सार्थक गायकवाडचा विशेष गौरव:
या सोहळ्यात तालुक्यातील सार्थक सुनील गायकवाड याची 'इंडियन एअर फोर्स'मध्ये 'एअरमन' पदावर निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्याच्या या यशामुळे उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण होते.
कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र, तसेच पालकांना शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी साप्ताहिक कुंभशिल्पचे संपादक श्री नितीन कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले. सचिन कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी तालुक्यातील कुंभार समाजाचे पदाधिकारी, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |