नाझरे येथे शिक्षक नेते अशोक पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

👤 अतुल फसाले | 📅 05 June 2026 | 👁 74 Views
नाझरे येथे शिक्षक नेते अशोक पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न


नाझरे, ता. सांगोला : जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागात तब्बल ३६ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व उल्लेखनीय सेवा बजावून सेवापूर्ती झालेल्या शिक्षक नेते तथा माजी मुख्याध्यापक अशोक आण्णाप्पा पाटील (गुरुजी) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित भव्य सत्कार व सन्मान सोहळा गुरुवारी सायंकाळी नाझरे येथील ग्रामपंचायत बाजार पटांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिपक आबा साळुंखे-पाटील, चेतनसिंह केदार तसेच डॉ. अनिकेत देशमुख उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशोक पाटील यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनेचे नेते म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला संघर्ष तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांची सक्रिय भूमिका याबद्दल वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षक बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अशोक पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास परिसरातील विविध गावांतील शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन उत्कृष्टरीत्या पार पडले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |