उदनवाडीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

👤 अतुल फसाले | 📅 05 June 2026 | 👁 166 Views
उदनवाडीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
उदनवाडी, ता. सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, उदनवाडी यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक व लोकोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती उत्सवाची सुरुवात रविवार, दि. ३१ मे रोजी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सायंकाळी मायाक्कादेवी ओविकार मंडळ, उदनवाडी यांच्या वतीने "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आख्यान" या विषयावरील ओवी कार्यक्रम संपन्न झाला.
सोमवार, दि. १ जून रोजी मंडळ व रेवनील रक्तपेढी, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच मंगळवार, दि. ३ जून रोजी युवक नेते मा. अक्षयभाऊ वलेकर यांच्या पुढाकारातून भव्य घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीत धनाजी सरगर यांनी प्रथम, भारत आलदर यांनी द्वितीय तर परमेश्वर रुपनर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेला स्पर्धक व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यंदाची ३०१ वी जयंती सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, गुणवंतांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सर्व सदस्य, उदनवाडी व परिसरातील ग्रामस्थ तसेच युवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी मंडळाच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |