"गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनी पंकजाताईंचा नैसर्गिक शेतीचा संकल्प; गोपीनाथगडावर मशागतीत सहभाग आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश"

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई . | 📅 04 June 2026 | 👁 195 Views
"गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनी पंकजाताईंचा नैसर्गिक शेतीचा संकल्प; गोपीनाथगडावर मशागतीत सहभाग आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश"
बीड | प्रतिनिधी
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी नैसर्गिक शेतीचा संकल्प करत गोपीनाथगड परिसरातील शेतीला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मशागतीच्या कामात सहभाग घेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला.
शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि पर्यावरणाचे संवर्धन साधत उत्पादनवाढीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पंकजाताईंनी सांगितले. नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल आणि नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून ओळख असलेले आचार्य देवव्रत यांनी विकसित केलेल्या ‘नैसर्गिक शेती मॉडेल’चा उल्लेख करत, या पद्धतीचा अवलंब आपल्या भागातील शेतकऱ्यांनी करावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेतलेला हा संकल्प आगामी काळात व्यापक जनचळवळीचे स्वरूप धारण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याचबरोबर ‘एक पेड पिता के नाम’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पंकजाताईंनी वृक्षारोपणही केले. पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या प्रसंगी डॉ. प्रीतम मुंडे, आर्यमन मुंडे, अगस्त्य मुंडे, स्थानिक पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेती, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |