आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्यासह दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

👤 विटा प्रतिनिधी | 📅 02 June 2026 | 👁 718 Views
आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्यासह दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ
सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणावरून एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भिवघाट येथील खासगी रुग्णालयात घडली. याप्रकरणी विकास अनिल कांबळे (वय ३२, रा. बेणापूर, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, विकास कांबळे हे ३० मे रोजी भिवघाट येथील एका खासगी रुग्णालयात होते. यावेळी आटपाडी तालुक्यातील संशयित सचिन बिरा मोटे (रा.विभुतवाडी) आणि अक्षय अर्जुन (रा.अर्जुनवाडी) यांनी विकास कांबळे यांच्या केबिनमध्ये येऊन त्यांना जाब विचारला."तू आमच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का करतोस ? आमचे भांडण आहे, आम्ही ते कधीही मिटवून घेऊ शकतो, तू कशाला मध्ये वळवळ करतोस? " असे म्हणत या दोघांनी कांबळे यांच्या जातीवरून अपमानास्पद शब्द वापरले. तसेच, "जर तू आमच्या विरोधात पोस्ट टाकणे बंद केले नाहीस, तर तुला सोडणार नाही," अशी धमकी दिली. या घटनेनंतर विकास कांबळे यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून विटा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३ (१) (आर), ३(१)(एस) व ३(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |