शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

👤 अतुल फसाले | 📅 01 June 2026 | 👁 168 Views
शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्धतेनुसार एसएसपी, टीएसपी आणि विविध संयुक्त खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
सोलापूर दि. 1 - डीएपीच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर एसएसपी, टीएसपी व संयुक्त खतांचा वापर फायदेशीर राज्यात खरीप हंगामास सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी केवळ डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यामध्ये मागील तीन वर्षांत खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते आणि एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मृदा परीक्षण व जमिनीच्या आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. खरीप हंगामात डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद हे अन्नद्रव्य असते. मात्र, राज्यात डीएपीचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने पर्यायी खतांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे.
स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपीनंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताला विशेष महत्त्व आहे. हे खत देशांतर्गत तयार होत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासोबत सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही असतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपी खताचा वापर लाभदायक ठरतो. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपी खतांचा वापर हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.
याशिवाय एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६, युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स आणि एनपीके १५:१५:१५ यांसारख्या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश ही महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे या खतांचा वापर पिकांच्या संतुलित पोषणासाठी उपयुक्त ठरतो.
तसेच टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्य असते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी खतांचा वापर केल्यास तोही डीएपीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्धतेनुसार एसएसपी, टीएसपी आणि विविध संयुक्त खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |