पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक २ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

👤 अतुल फसाले | 📅 01 June 2026 | 👁 232 Views
 पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक २ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
कोणताही लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती (एजंट) शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तातडीने एसीबी सोलापूर कार्यालयाशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६८ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
सोलापूर - जन्म-मृत्यू नोंदणी संदर्भातील आदेश मिळवून देण्यासाठी २,००० रुपयांची लाच घेणाऱ्या पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला आणि त्याच्या एका खाजगी साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज, १ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे करण्यात आली.
आरोपींची नावे अलीफ शमशुद्दीन सुतार (वय २९, पद- महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय पंढरपूर, रा. मंगळवेढा) , मारुती ज्ञानोबा वाघमारे (वय ५०, खाजगी इसम, रा. येळगी, ता. मंगळवेढा)
तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात. त्यांच्या पक्षकाराच्या जन्म-मृत्यूची नोंद होण्यासाठी तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन आदेश मिळणे आवश्यक होते. हा आदेश लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी लोकसेवक अलीफ सुतार याने २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम त्याने स्वतः स्वीकारली, तर या संपूर्ण प्रकरणात खाजगी इसम मारुती वाघमारे याने मध्यस्थी/मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
एसीबीची यशस्वी कारवाई:
तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती. त्यानुसार २९ मे २०२६ आणि आज १ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. आज १ जून रोजी एसीबीने पंढरपूर येथे सापळा रचून आरोपी अलीफ सुतार याला २,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि ७ अ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील व श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक श्री. शैलेश पवार, रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |