राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेत ४१ गुन्हे दाखल, २९ आरोपींना अटक
👤 राहुल टिबे सांगली |
📅
01 June 2026 |
👁 170 Views
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, पुणे जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमिवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यात दिनांक २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान एक वाहन आणि इतर मुद्देमालासह एकूण रु. ५,७१,७६५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये देशी मद्य (Country Liquor): ५७.३२ बल्क लीटर, हातभट्टी मद्य (Illicit Liquor): १०१५.०० बल्क लीटर, विदेशी मद्य (IMFL/Beer - In State): ३.७२ बल्क लीटर, ताडी (Toddy): २५०.०० बल्क लीटर इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रसायन / (Wash): १०१२०.०० बल्क लीटर जागीच नाश करण्यात आले. विभागामार्फत यापुढील काळातही जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अशीच कडक कारवाई सुरू राहील, असे पत्रकात म्हटले आहे.