बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 187 Views
बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी
कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या गतिरोधकांची पाहणी करण्यात आली. याशिवाय परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचाही आढावा घेण्यात आला. यावेळी तेजस राणे, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेवक स्वप्नील राणे, माजी नगरसेवक सदानंद राणे, आबाजी राणे, अमृत राणे, सुमित राणे, दत्ताराम साटम, मारुती राणे, बाळा राणे, नाना राणे, विष्णू राणे, प्रविण सावंत, वसंत राणे, रामदास मांजरेकर, हरेश निखार्गे, निकीत मुरकर, संतोष आमडोसकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |