परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट; नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 239 Views
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट; नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, वैभव मालंडकर, सुजित जाधव, संतोष पुजारी, सौरभ पारकर, निकीत मुरकर, अमेय पारकर, उमेश आरोलकर, प्रशांत अंधारी, संजय पारकर यांच्यासह विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय यंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड तसेच विभागीय व आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर करून कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोकळी जागा नगरपंचायतीला व्यापारी तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली. निवेदनात नमूद केल्यानुसार, या जागेचा नियोजनबद्ध विकास करून व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देणे शक्य होणार आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेबाबत माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या मागणीबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |