दहिवडीच्या 'फिनिक्स'ची उंच भरारी; अकॅडमीचे ४५ हून अधिक विद्यार्थी पोलीस दलात दाखल!

👤 आकाश दडस सातारा | 📅 30 May 2026 | 👁 557 Views
दहिवडीच्या 'फिनिक्स'ची उंच भरारी; अकॅडमीचे ४५ हून अधिक विद्यार्थी पोलीस दलात दाखल!
नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई व महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अंतिम निकालात माण तालुक्यातील दहिवडी येथील 'फिनिक्स करिअर अकॅडमी' च्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अकॅडमीतील ४५ हून अधिक मुला-मुलींची पोलीस दलात निवड झाली असून, या घवघवीत यशामुळे दहिवडी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा फिनिक्स अकॅडमीमध्ये फेटे बांधून, पेढे भरवून अत्यंत भावूक वातावरणात जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप शिरकुळे सर म्हणाले, "आम्ही कोणतीही मोठी जाहिरातबाजी किंवा शो-शाईनिंग करत नाही. आमचा फक्त गुणवत्तेवर विश्वास आहे. उच्चशिक्षित स्टाफ आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत यांच्या जोरावरच हे यश मिळाले आहे." एकट्या मुंबई शहर पोलीस दलात अकॅडमीच्या १६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात मिळून ४२ ते ४५ हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलीस दलात दाखल झाले आहेत.
४७ व्या वर्षी माजी सैनिकाची वर्दीसाठी जिद्द या वेळच्या सत्कार सोहळ्यात भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक विष्णू निवृत्ती जाधव (वय ४७ वर्ष, रा. लोधवडे) यांचा झालेला सत्कार विशेष लक्षवेधी ठरला. वयाच्या ४७ व्या वर्षीही जिद्द न हारता शिरकोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई पोलीस दलात यश मिळवले. गावात राजकीय नेत्यांकडून सत्कार न स्वीकारणाऱ्या या फौजीने "माझा सत्कार फक्त माझ्या गुरूंनी करावा" अशी इच्छा व्यक्त केल्यावर संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिरकुळे सरांनी सांगितले की, "ग्रॅज्युएशन संपवून पोलीस भरतीकडे वळण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावी संपल्यापासूनच अकरावी-बारावी करत मैदानी व लेखी परीक्षेचा पाया मजबूत करावा. त्यामुळे वयाच्या १९ व्या किंवा २० व्या वर्षीच सरकारी नोकरी मिळवणे सोपे जाते. दहिवडी येथील सातारा-वडूज रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या या अकॅडमीत सध्या मुलींची बॅच पूर्ण झाली असून, मुलांसाठी काही मदत जागा शिल्लक आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या या यशाबद्दल संपूर्ण माण-खटाव तालुक्यातून फिनिक्स अकॅडमीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |