केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज जत तालुक्याच्या दौऱ्यावर

👤 सतिशकुमार पडोळकर जत | 📅 30 May 2026 | 👁 215 Views
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज जत तालुक्याच्या दौऱ्यावर
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच रामदास आठवले यांच्या जत तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्यक्रम पार पडणार असून रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ मार्च १९३४ रोजी भेट दिलेल्या जत तालुक्यातील ऐतिहासिक स्थळाला रामदास आठवले भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान त्या ठिकाणाची पाहणी करून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारणीबाबत चर्चा केली जाणार आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याशिवाय, जत तालुक्यातील येळवी (ता. जत) येथे रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले) नामफलकाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे राज्य व जिल्हास्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यात रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव व माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे तसेच अरविंद कांबळे, पोपट कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सामाजिक न्याय, आंबेडकरी चळवळ, दलित समाजाच्या प्रश्नांवरील चर्चा तसेच संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |