पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

👤 सतिशकुमार पडोळकर जत | 📅 30 May 2026 | 👁 270 Views
पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी
जत तालुक्यातील लकडेवाडी येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाला जत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी संशयित पृथ्वीराज खंडू भिसे (वय २२) याचा त्याचे वडील खंडू श्रीमंत भिसे (वय ४५) यांच्याशी काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पृथ्वीराजने वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात खंडू भिसे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले; मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीदरम्यान तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार जत न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि अन्य बाबींचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो याचे विदारक उदाहरण ठरत असून, संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |