“संडे ऑन सायकल” विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 May 2026 | 👁 226 Views
“संडे ऑन सायकल” विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
फिट इंडिया मिशन अंतर्गत ७ जून रोजी देवगड तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन
फिट इंडिया मिशन अंतर्गत अधिक तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने रविवार, ७ जून २०२६ रोजी “संडे ऑन सायकल” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायकल वापराबाबत जागृती निर्माण करणे हा आहे. पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन, स्वच्छता तसेच दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर सायकल रॅली, जनजागृती फेरी, स्वच्छता संदेश प्रसार आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत, बचत गट सदस्य, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“संडे ऑन सायकल” मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेशही व्यापक स्तरावर पोहोचणार असल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले.
सदर मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी फिट इंडिया मिशनच्या
https://fitindia.gov.in/world-bicycle-day या
अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |