समृद्ध पंचायतराज' अभियानात माण तालुक्यातील 'थदाळे' गावाची उत्तुंग भरारी!

👤 आकाश दडस सातारा | 📅 25 May 2026 | 👁 192 Views
समृद्ध पंचायतराज' अभियानात माण तालुक्यातील 'थदाळे' गावाची उत्तुंग भरारी!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत माण तालुक्यातील आदर्श गाव थदाळे येथे २३ मे रोजी जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे आणि टीमने गावाने केलेल्या उल्लेखनीय कामांचे विशेष कौतुक केले. यावेळी सर्व टीमने ग्रामदैवत श्रीनाथ मस्कोबाचे दर्शन घेतले.


चौफेर विकासाचा 'थदाळे पॅटर्न'

थदाळे गावाने मूलभूत सोयी-सुविधांसह शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. समितीच्या वतीने प्रामुख्याने खालील घटकांची पाहणी करण्यात आली. १००% कर वसुली: गावाने ग्रामपंचायत कराची शंभर टक्के वसुली करून एक नवा पायंडा पाडला आहे .संपूर्ण गावात यशस्वी 'प्लॅस्टिक बंदी' लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गाव हिरवेगार करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि ग्रामस्थांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यावर गावाने विशेष भर दिला आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात थदाळे ग्रामपंचायत अत्यंत यशस्वी ठरली आहे.शंभर टक्के घरकुल पूर्ण केले आहेत.


या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याच्या वेळी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,थदाळे गावाच्या सरपंच सौ. माधुरी रामसिंग रजपूत, ग्रामपंचायत अधिकारी आकाराम ओंबासे, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, तसेच गावातील महिला मंडळ, तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच थदाळे गाव समृद्धीच्या वाटेवर अग्रेसर असल्याचे याप्रसंगी दिसून आले. ग्रामपंचायत अधिकारी आकाराम ओंबासे यांचे विशेष अभिनंदन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |