ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय.!

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 24 May 2026 | 👁 220 Views
ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय.!
जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात! पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.!
कणकवली : पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून 'जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात' असल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

ग्रामीण भागातील अनेक प्रमुख रस्त्यांवर डांबर पूर्णपणे उखडले असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचल्याने रस्ता नेमका कुठे आहे, याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना या चिखलातून गाड्या काढताना कसरत करावी लागत असून, रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. स्वप्नातील गुळगुळीत रस्त्यांचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे वाभाडे या चिखलमय रस्त्यांनी काढले आहेत.

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला हाच त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने तात्काळ जागे होऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आता तरी जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात न राहता या खडेयुक्त आणि चिखलमय रस्त्यांवर ठोस उपाययोजना करणार का? की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? असा देखील संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आता तरी जागे होते काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |