भाटकी गावचे सुपुत्र प्रा. शिवाजी कोळेकर यांना ‘वाणिज्य’ विषयात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान

👤 आकाश दडस सातारा | 📅 24 May 2026 | 👁 279 Views
भाटकी गावचे सुपुत्र प्रा. शिवाजी कोळेकर यांना ‘वाणिज्य’ विषयात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान
माण तालुक्यातील भाटकी गावचे सुपुत्र प्राध्यापक शिवाजी कोळेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतून पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी जाहीर झाली आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने शिक्षण क्षेत्रात मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे भाटकी गावासह संपूर्ण माण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


प्रा. शिवाजी कोळेकर यांनी "पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण विकास योजनांच्या कामगिरीचा चिकित्सक अभ्यास" या विषयावर आपला महत्त्वपूर्ण शोधप्रबंध सादर केला होता. त्यांनी आपल्या संशोधनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांसारख्या प्रमुख ग्रामीण विकास योजनांच्या प्रत्यक्ष कामगिरीचे सखोल मूल्यमापन केले आहे.

त्यांनी आपले हे संशोधन ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव येथील संशोधन केंद्रात पूर्ण केले. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा (जि. अहिल्यानगर) येथील डॉ. संजय बाळू शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. कोळेकर यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि विविध स्तरांतून त्यांचे मोठे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे.प्रा शिवाजी कोळेकर यांचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व भाटकी गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गुंजाळवाडी, ता.संगमनेर प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता आमदार अमोल खताळ | बाज गोळीबार प्रकरणाचे पडसाद! जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी; कंट्रोल रूममध्ये रवानगी | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 असा असेल. | दर्शनाहून परतताना काळाचा घाला! विहिरीत कोसळलेल्या पिकअपने १४ भाविकांचा जीव घेतला; संपूर्ण गाव शोकसागरात | प्रेमिकेसोबत लॉजवर लपला, पण एलसीबीच्या जाळ्यात अडकला! | १५ जून जवळ आली की शाळेच्या आठवणी पुन्हा मनात दरवळतात – प्रसिद्ध अँकर प्रदीप अहिरे यांची भावनिक प्रतिक्रिया | आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा | नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था.. | ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : ना. नितेश राणे | वनगळी येथे महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार |