आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द
👤 अतुल फसाले |
📅
24 May 2026 |
👁 176 Views
सोलापूर दि. २२ :- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक दिनांक २६ सप्टेंबर, २०१२ नुसार तालुका, जिल्हा/महानगरपालिका, विभागीय व मंत्रालय स्तरांवरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश दिलेले आहेत.
उक्त परिपत्रकातील कलम ५.७ नुसार ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरीता आचारसंहिता लागू असते, त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र दि. १८.०५.२०२६ नुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या सोलापूर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आचारसंहिता दि. १८ मे २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे दि. ०१ जून २०२६ रोजी होणारा जिल्हा लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली आहे.