संगमनेरच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री दरबारी धडक; सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन आमदार अमोल खताळ

👤 संकेत तुकाराम सानप (मुंबई मंत्रालय) | 📅 23 May 2026 | 👁 296 Views
संगमनेरच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री दरबारी धडक; सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन आमदार अमोल खताळ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण व जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रांद्वारे शेतकरी, वारकरी आणि समाजहिताशी संबंधित अनेक मागण्या मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडण्यात आल्या. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांना न्याय्य मोबदल्याची मागणी
सुरत-नाशिक-अहिल्यानगर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील लोहारे, मिरपूर आणि तळेगाव परिसरातील सुपीक जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर ‘समृद्धी महामार्गा’प्रमाणे बाधित शेतकऱ्यांना ४ पट वाढीव आणि न्याय्य मोबदला देण्यात यावा, अन्यायकारक मोबदल्याचा फेरविचार करण्यात यावा, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली.
“आधुनिक हिरकणी” गंगुबाई गायकवाड यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी
मौजे खरशिंदे येथील ६५ वर्षीय श्रीमती गंगुबाई गायकवाड यांनी घरात शिरलेल्या वाघाचा अत्यंत धैर्याने सामना करून स्वतःचा आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रसंगावधान राखत वाघाला घरात कोंडून ठेवले.
त्यांच्या या अद्वितीय शौर्याबद्दल शासनाने त्यांना “हिरकणी पुरस्कार” किंवा तत्सम शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या घटनेची राज्यभर चर्चा होत आहे.
आषाढी वारीसाठी गॅस टाक्यांचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी
आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. दिंड्या, मठ आणि भाविकांच्या भोजन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर गॅस टाक्यांची आवश्यकता असते. अनेकदा वारीच्या काळात गॅस टंचाई निर्माण होऊन भाविकांची गैरसोय होते.
ही अडचण लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि गॅस वितरण कंपन्यांना आवश्यक निर्देश देऊन वारीदरम्यान गॅस टाक्यांचा पुरेशा प्रमाणात व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली.
या सर्व विषयांवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने संबंधित नागरिक, शेतकरी आणि वारकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |