आटपाडी बाजार समितीस निव्वळ नफा ९९०८३८३.७४ रुपये .. सभापती संतोष पुजारी

👤 राहुल टिबे सांगली | 📅 22 May 2026 | 👁 363 Views
आटपाडी बाजार समितीस निव्वळ नफा  ९९०८३८३.७४ रुपये .. सभापती संतोष पुजारी
आटपाडी बाजार समिती येथे सर्व सोयीनियुक्त मुख्य बाजार आवार असून दिघंची, करगणी, खरसुंडी व झरे येथे उपबाजार आवारे आहेत. तसेच केंद्रशासनाची ई-नाम योजना बाजार समितीत कार्यान्वीत असून सर्व व्यवहार ऑनलाईन पध्दतीने होत असून याचाही फायदा शेतकरी, व्यापारी यांना होत आहे.
खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास ( बाबर व आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू असून विद्यमान सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनिल सरक व सचिव शशिकांत जाधव, सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करुन उत्पन्न वाढविलेले आहे.
तसेच जयदिप भोसले, जि.प. सदस्य आणि मलक्ष्मण सरगर, अध्यक्ष सांगली जिल्हा रा.स.पा. यांचेही बाजार समितीस सहकार्य लाभले आहे.तर सन २०२५-२६ चे उत्पन्न रु. २३८०१२६४.६० इतके झालेले आहे. बाजार समितीस निव्वळ नफा रु. ९९०८३८३.७४ इतका मिळालेला आहे.

बाजार समितीचे विद्यमान सभापती संतोष पुजारी यांनी शेतक-याच्या हितास प्राधान्य देऊन बाजारपेठ वाढीसाठी आवश्यक अधिकच्या सोयी सुविधा पुरविणेत येतील तसेच बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |