जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 178 Views
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती असून त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात. समाज माध्यमांमध्ये समाजविघातक विचार पसरविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आवश्यक आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. युवकांनी सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करावा तसेच देशविघातक आणि हिंसक प्रवृत्तींना वेळीच रोखावे. राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कार्यक्रमात दहशतवादमुक्त, शांततामय आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, आरती देसाई, प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |