सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 150 Views
सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ
वर्षाला ३००० अनुदान मिळत होते,आता मिळणार वार्षिक १ लाख आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश
सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे. 1970 पासून 250 रुपये मासिक तसेच वर्षाला 3,000 मिळणाऱ्या मानधनात 55 वर्षे कोणतीच वाढ झाली नव्हती. याबाबत ,आमदार निलेश राणे, व देवस्थान न्यास, यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करतं प्रतिमाह 8,333 तर वर्षाला 1 लाख इतकी अनुदानात वाढ केली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या माध्यमातून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री नितेश राणे यांसह राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
सन १९७० पासून अनुदानात वाढ करण्यात आलेले नाही. याबाबत सिंधुदुर्ग किल्ला श्री. शिवराजेश्वर देवस्थान न्यास विश्वस्त यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२० रोजी अनुदान वाढ बाबत निवेदनद्वारे शासनाचे लक्ष वेधले. श्री. शिवराजेश्वर देवालयातील पुजारी व इतर सेवेकरी यांचे पगार, मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च तसेच, मंदिराकडून आयोजित करण्यात येत असलेले उत्सव याकरीता सदरहू अनुदानाची रक्कम अत्यंत कमी पडत असल्याने अनुदानात वाढ करण्याबाबत विनंती करण्यात आली.

*आमदार निलेश राणे यांनी वेधले होते लक्ष*

सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री शिवराजेश्वर हे एकमेव ऐतिहासिक मंदिर आहे. सदर मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या देवस्थान न्यासाला महसुल विभागाकडून सन 1971 पासून पुर्जाअर्चनेसाठी मासिक २५०/- या प्रमाणे मानधन देण्यात येते. सदर मानधनात सन १९७१ पासून कोणतीच वाढ झालेली नाही. त्यामुळे आजच्या महागाईच्या तुलनेत न्यासाला मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे असून सदर मानधनात वाढ होणे आवश्यक आहे. किमान १,००,०००/ रुपयांचे मानधन देवस्थान न्यासाला मिळावे. असे निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करत आमदार निलेश राणे यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.

आता मिळणार 1 लाख अनुदान

विश्वस्त, श्री. शिवराजेश्वर देवस्थान न्यास, सिंधुदूर्ग किल्ला तसेच पालकमंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे, यांच्या मागणी अनुषंगाने, सिंधुदूर्ग किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात प्रतिमाह रू.८३३३/- प्रमाणे वर्ष भारत रू. १ लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |