राजेवाडी तलावातून विनापरवाना मातीचा 'दरोडा'; महसूल आणि आरटीओ प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?

👤 आकाश दडस सातारा | 📅 21 May 2026 | 👁 289 Views
राजेवाडी तलावातून विनापरवाना मातीचा 'दरोडा'; महसूल आणि आरटीओ प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष?
नागरिकांचा इशारा... राजेवाडी तलावाचे अस्तित्व धोक्यात आणणारा हा अवैध माती उपसा आणि जीवघेणी वाहतूक तातडीने बंद न झाल्यास, हिंगणी गावातील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. आता यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे कारवाईचे 'ब्रेक'; हिंगणी परिसरात अपघातांचे सत्र वाढले!

माण तालुक्यातील हिंगणी गावच्या शिवारातील ऐतिहासिक राजेवाडी तलावातून सध्या वीटभट्टी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आणि विनापरवाना माती उपसा सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा शासकीय महसूल न भरता, दिवसाढवळ्या निसर्गाची लूट सुरू असतानाही महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'या चाललेल्या लुटीवर प्रशासन कधी चाप लावणार?' असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.


शासकीय महसुलाला चुना!


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वीटभट्टी चालकांनी महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकृत परवाना घेतलेला नाही, तसेच नियमानुसार भरायचा असणारा रॉयल्टी (परवाना कर) देखील भरलेला नाही. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एकीकडे सर्वसामान्यांवर किरकोळ कारणावरून दंडात्मक कारवाई करणारे महसूल विभाग एवढ्या मोठ्या बेकायदेशीर उत्खननाबाबत कमालीचे 'थंड' का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अपघातांचे सत्र; आरटीओ सुस्त!


या विनापरवाना मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची गती प्रचंड असून, नियमांचे कोणतेही पालन केले जात नाही. ओव्हरलोड आणि बेदरकार वाहतुकीमुळे हिंगणी परिसरात अनेक मोठे अपघात घडले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली असून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) आणि स्थानिक पोलिसांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.


सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त की प्रशासनाची लाचारी?

या संपूर्ण प्रकरणामागे एक धक्कादायक बाब समोर येत आहे. माती उपसा करणारी ही वाहने आणि संबंधित वीटभट्टी मालक हे सत्ताधारी राजकीय पक्षाच्या अत्यंत जवळचे आणि मर्जीतले असल्याचा सुगावा लागला आहे. राजकीय दबावापोटीच महसूल आणि पोलीस प्रशासन कोणतीही तातडीची कारवाई करण्यास धजावत नसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |