सलून मधील कामगार मारहाण प्रकरणी कणकवलीतील ६ जणांसह अन्य युवकांवर गुन्हा दाखल

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 May 2026 | 👁 161 Views
सलून मधील कामगार मारहाण प्रकरणी कणकवलीतील ६ जणांसह अन्य युवकांवर गुन्हा दाखल
कणकवली येथील भवानी कॉम्प्लेक्स
परिसरात दोन मुलींची छेड काढल्याच्या प्रकारातून झालेल्या वादानंतर बेकायदेशीर जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात सात जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पुनम महेश मिठबावकर (वय ३८, रा. दांडी, मालवण) यांनी दिली आहे. त्यानुसार, दिनांक १५ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान कणकवली येथील भवानी कॉम्प्लेक्स, तेलीआळी परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या दुकानातील दोन कामगारांनी दोन मुलींची छेड काढल्याचा आरोप आहे. या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संबंधित कामगार ज्या खोलीत राहत होते तेथे जाऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्या कामगारांना फिर्यादी यांच्या परिसरातील दुकानांमध्ये आणून पुन्हा मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मिथिलेश भंडारी, मिथुन ठाणेकर, गौरव हर्णे, सुनील निकम, राजू निकम, प्रशांत तेली तसेच छेड काढण्यात आलेल्या दोन मुली आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |