ईश्वरपूर मध्ये गांधी चौकात भीषण आग : ढबू बंधूंच्या दुकानांचे लाखोंचे नुकसान

👤 राहुल टिबे सांगली | 📅 16 May 2026 | 👁 303 Views
ईश्वरपूर मध्ये गांधी चौकात भीषण आग : ढबू बंधूंच्या दुकानांचे लाखोंचे नुकसान
धुराचे लोट उसळताच नागरिकांची धावपळ ; अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला
ईश्वरपूर शहरातील गजबजलेल्या गांधी चौक मुख्य बाजारपेठेत आज दुपारी चारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन व्यापारी बंधूंच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. श्री संतोष ढबू आणि महावीर ढबू यांच्या स्वतंत्र दुकानांच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर अचानक मोठमोठे धुराचे लोट उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
क्षणार्धात आग भडकत संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला. दोन्ही दुकानांमध्ये भडंग, फरसाण, कुरकुरे, शेंगदाण्याचे स्नॅक्स, चॉकलेट, बिस्किटे तसेच पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कॅरीबॅग व इतर माल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी व नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत दुकानातील शक्य तितका माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ईश्वरपूर नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचे मोठे फवारे मारून आग आटोक्यात आणली.
मात्र आग विझवण्याच्या प्रयत्नात दुकानातील बहुतांश माल पूर्णपणे भिजल्याने तो खराब झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ढबू बंधू हे परिसरात अतिशय मनमिळावू व चांगल्या स्वभावाचे व्यापारी म्हणून परिचित असल्याने त्यांच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |