पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा व मनसेला जोरदार धक्का

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 May 2026 | 👁 184 Views
पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा व मनसेला जोरदार धक्का
मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष नारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच उबाठा पक्षाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, प्रविण राणे युवा शाखा प्रमुख प्रवीण राणे, बूथ अध्यक्ष अंकुश गुरव, संतोष गुरव, साहिल गुरव यांनी ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे नामदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
मांगवली येथील सिद्धी संतोष नारकर यांच्या समवेत मनसेचे संतोष नारकर, समीक्षा नारकर, साई नारकर, विलास नारकर, विघ्नेश नारकर, विजय नारकर, वैशाली नारकर, सुरेंद्र आपिष्टये, गणेश आपिष्टये, नागेश आपिष्टये, सिद्धेश आपिष्टये, सुरेश रेडिज, अशोक आपिष्टये,
आशिष आपिष्टये, नागेश आपिष्टये, पुष्पा हेगिष्टे व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मांगवली गाव भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. उबाठा व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने मांगवली गावात भाजपा शत प्रतिशत झाली आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी राजेंद्र राणे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन महेश संसारे उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |